प्रसिद्ध पावभाजी विक्रेता तिसऱ्यांदा निवडणूक लढणार

0

चंदीगड : हरियाणामधील गुरुग्राम सिव्हिल लाईन्स परिसरातील प्रसिद्ध पावभाजी विक्रेते कुशेश्वर भगत पुन्हा एकदा निवडणुकीत आपले नशीब आजमावणार आहेत. कुशेश्वर यांनी यापूर्वी दोनदा राष्ट्रपतीपदाची, तीनदा लोकसभा आणि दोनदा विधानसभेची निवडणूक लढवली आहे. मात्र प्रत्येक निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आहे. आता पुन्हा एकदा ते अपक्ष निवडणूक लढवत आहेत.

कुशेश्वर भगत हे गुरुग्रामच्या सिव्हिल लाईन्स भागात पावभाजीचा व्यवसाय करतात. त्यांच्या पावभाजीची चव प्रसिद्ध आहे. यंदा ते लोकसभा निवडणुकीत आपले नशीब आजमावत आहेत. त्यामुळे त्यांना यश मिळते की नाही हे निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल. आपण १२ लाख मतांनी विजयी होऊन जनतेची सेवा करणार असल्याचा दावा कुशेश्वर भगत यांनी केला आहे.

गुरुग्राम मतदारसंघात अनेक समस्या आहेत. जनतेची काळजी घेणारे कोणी नाही. २० वर्षे राज्य करणाऱ्या नेत्यांमुळे गुरुग्रामच्या जनतेचा भ्रमनिरास झाला आहे, आता लोकांना बदल हवा आहे, असे म्हणत कुशेश्वर यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. हरियाणातील गुरुग्राम लोकसभा मतदारसंघातून २६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या मतदारसंघात सहाव्या टप्प्यात म्हणजेच २५ मे रोजी लोकसभा निवडणूक होणार आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech