‘मॅगी’सह भात खाल्ल्यानंतर १० वर्षांच्या मुलाचा मृत्यू

0

पिलीभीत –  उत्तर प्रदेशच्या पिलीभीतमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. मॅगी खाल्ल्यानंतर १० वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. तसेच कुटुंबातील इतर पाच सदस्यांना विषबाधा झाली असून त्यांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या सदस्यानींही मॅगी न खाल्ली होती, असे सांगितले जाते. या कुटुंबातील सदस्यांनी भातासह मॅगी खाल्ल्यानंतर त्यांना विषबाधा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

हजारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या राहुल नगर परिसरात हा प्रकार घडला आहे. दरम्यान कुटुंबातील सदस्यांची प्रकृती खालावल्यामुळे सर्वांना पुरणपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. भातासह मॅगी खाणे हे ऐकायला जरा विचित्र वाटत असले, तरी अशी घटना घडली आहे. राहुल नगर येथे राहणाऱ्या मनिराज यांची मुलगी सीमा आपल्या तीन मुलांसह देहरादूनहून आपल्या माहेरी आली होती. दोन दिवसांपूर्वी त्यांनी घरी जेवणासाठी मॅगी आणि भात केला होता. सीमा आणि तिच्या तीन मुलांव्यतिरिक्त त्यांची बहीण, भाऊ आणि त्याच्या पत्नीनेही मॅगी-भात खाल्ला.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech