जालना – जालना लोकसभेचे महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांनी भोकरदन येथील जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर कुटुंबासमवेत आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. मी चार लाख मतापेक्षा जास्त मतांनी निवडून येणार आहे आणि देशभरामध्ये आमच्या ४०० पेक्षा जास्त जागा निवडून येणार आहेत. तसंच महाराष्ट्रामध्ये काही भागात उष्णतेमुळे मतदान जरी कमी झाले असले मात्र आज उष्णता कमी असल्याने मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मतदान करून आपला लोकशाहीचा हक्क बजावावा अशी प्रतिक्रिया यावेळी महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी निर्मला दानवे, आमदार संतोष पाटील दानवे, सून रेणू दानवे यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.