फक्त तेरे नाम’ भांग पाडून फिरत असतात

0

मुंबई – मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेकडे राज्यातील कोट्यवधी मराठा बांधवांचे लक्ष लागले आहे. राज्यात लोकसभा निवडणुकांचे तीन टप्प्यातील मतदान पूर्ण झाले असून आता चौथा टप्प्यात सोमवारी मतदान होत आहे. चौथ्या टप्प्यात बीड आणि जालना लोकसभा मतदारसंघातही मतदान होणार आहे. मनोज जरांगे यांचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या जालना व बीड लोकसभा मतदारसंघातील मतदानापूर्वीच जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा समाज बांधवांना हाक दिली आहे. लोकसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर पुन्हा एकदा विराट सभा घेणार असल्याची घोषणा जरांगे पाटील यांनी केली. तसेच, मंत्री आणि भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांच्यावरही तिखट शब्दात प्रहार केला.

8 जून रोजी नारायण गड येथे भव्य सभा घेतोय, 15 मे रोजी येथील जागेवर जाऊन पाहणी करणार आहे. त्यानंतर, राज्यभरातील सर्वच मराठा बांधवांना येथील सभेसाठी आवाहन करण्यात येत असून 6 कोटी मराठा बांधव याठिकाणी येणार आहेत, असे जरांगे यांनी म्हटले. 15 तारखेच्या पाहणीनंतर सभेबाबतचा अंतिम निर्णय मी घेणार, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच,मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना चंद्रकांत पाटील आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

चंद्रकांत पाटील यांना मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष का केलं? त्यांना काय कळतं. फक्त तेरे नाम भांग पाडून फिरत असतात, स्वतःची 37 मतं तरी त्यांना पडतात का?, अशा शब्दात मनोज जरांगे यांनी चंद्रकां पाटील यांची खिल्ली उडवली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech