राज ठाकरे यांच्या निशाण्यावर मुंब्रा, अतिरेक्यांची यादीच वाचली

0

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्याचे उमेदवार नरेश म्हस्के आणि कल्याण-डोंबिवलीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्यासाठी कळवा येथे सभा घेतली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टिका केली. ठाकरे यांना मते देण्यासाठी मशिदीतून फतवे निघाल्याचे ते म्हणाले. राष्ट्रप्रेमी मुस्लीमाबद्दल आपल्याला आदर आहे. काही मुस्लीमांना दंगे नको आहेत. पण काही वाह्यात लोकं आहेत. मी जे दाखवतोय ते फक्त एका मुंब्र्याची गोष्ट सांगतो. असे सांगत राज ठाकरे यांनी मुब्रा येथून झालेल्या अतिरेकी कारवाया आणि येथे सापडलेल्या अतिरेक्यांची यादीच वाचून दाखविली.

राज ठाकरे पुढे म्हणाले की पुण्यात फतवे काढले गेले. महाविकास आघाडीला मतदान करावं. का तर गेल्या दहा वर्षात वाह्यातपणा करता आला नाही. त्यासाठी त्यांना पाठिंबा दिला जात आहेत. काही मुस्लिम चांगले आहेत. त्यांना दंगे नको आहेत. पण काही वाह्यात लोकं आहेत. मी जे दाखवतोय ते फक्त एका मुंब्र्याची गोष्ट सांगतो. मुंब्र्यातील सीमीचे सहा अतिरेक्याला अटक. संसदेवर हल्ला झाला त्याचा गुन्हेगार मुंब्र्यात सापडला. हिजबूल मुजाहिदीनला मुंब्र्यातून अटक, इशरत जहाँ शेख मुंब्र्यात राहत होती. लष्कर ए तोयबाचा अतिरेकी मुंब्रा, पॉप्युलर फ्रंटच्या चौघांना मुंब्र्यातून अटक. पॅलेस्टाईनला पाठिंबा देण्यासाठी मुंब्र्यात निदर्शन झाले. आयसीसीच्या अतिरेक्याला अटक. यावर दैनिक सामनातून अग्रलेखही लिहिला होता. पण, आता नाही बोलणार. आयएसआय आणि तोयबाशी संबंध असल्याच्या संशयावरून मुंब्र्यातून एकाला अटक केली. टाटा इन्स्टिट्यूटचा अहवाल. त्यात मुंब्र्यावर चिंता व्यक्त केली आहे. हे आपल्या आजूबाजूला सुरू आहे. लांबचं सांगत नाही. काही सुरक्षेचा विषय नाही.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech