निलेश सांबरे यांच्या जिजाऊत जोरदार इनकमिंग…

0

 

कल्याण : भिवंडी लोकसभा मतदारसंघातून निलेश सांबरे हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली असून ठिकठीकाणी सर्व जाती धर्मांतून त्यांच्या सामाजिक कामाच्या बळावर त्यांना जोरदार पाठींबा मिळत आहे. अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी , बच्च्चू (भाऊ ) कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षासह विविध कुणबी आणि मुस्लीम समाजाच्या संघटना-राजकीय पक्षांकडून त्यांना पाठींबा मिळालेला आहे. शिवाय शहापूर मधून भाजपाचे दोन नगरसेवक यांनी देखील जिजाऊ संघटनेच्या सांबरे यांना पाठींबा दिला आहे. त्यानंतर आता पुन्हा कल्याण मध्ये येथील कॉंग्रेससह इतर अल्पसंख्याक समुदायाने निलेश सांबरे यांना पाठींबा दर्शवत जिजाऊ संघटनेत प्रवेश केला आहे. यामुळे प्रत्येक स्तरांतून येत असलेल्या वाढत्या पाठींब्याने सांबरे यांचे मतदारसंघातील वजन आणखी वाढले आहे. यामुळे तळागाळातील लोकांमध्ये सांबरे यांची लोकप्रियता वाढत असून विविध समुदायांकडून प्रतिसाद मिळत आहे.

काल रात्री कल्याण येथे फैजल जलाल माजी नगरसेवक , कल्याण महानगरपालिका ,काजीम शेख मनसे विभाग अध्यक्ष , हुजुर कुरेशी अल्पसंख्यांक राष्ट्रवादी कल्याण विधानसभा उपाध्यक्ष , फैज कुरेशी समाजसेवक, शाबिर कुरेशी माजी नगरसेवक , माजी शिक्षक संघटना अध्यक्ष , सलिमभाई शेख कॉंग्रेस जिल्हा अध्यक्ष कल्याण यांनी जाहीरपणे जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या कार्यशैलीवर आणि प्रामाणिकपणे निस्वार्थी वृत्तीने समाजासाठी केलेल्या कार्याने प्रभावित होवून जाहीरपणे पाठींबा दर्शवत सांबरे यांच्या जिजाऊ संघटनेत प्रवेश केला आहे.
भिवंडी लोकसभा ही कॉंग्रेसच्या हक्काची जागा असताना शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड यांनी जाणीवपूर्वक कॉंग्रेसचे अस्तित्व संपवण्यासाठी ही जागा आपल्याकडे मागून घेतली . तसेच सुरेश म्हात्रे म्हणजेच बाळ्यामामा या नाकर्त्या व्यक्तीला महावीआतून उमेदवार म्हणून उभे केले. त्यामुळे आमच्या फक्त अल्पासंख्यांक सामुदायाच्या मतांवर डोळा ठेवून ही मंडळी आमचा फायदा घेणार असतील तर त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ असे सांगत आपण निलेश सांबरेसारख्या सच्च्या आणि समाजासाठी तळमळीने काम करणा-या व्यक्तीला तन-मन लावून जिंकून आणू असा ईशाराही त्यांनी याप्रसंगी दिला आहे.
सांबरे यांच्या विविध क्षेत्रातील सामाजिक कार्याची स्तुती करत आपण सांबरे यांच्या समाजकार्याने प्रेरित होऊनच त्यांना पाठींबा देत असल्याचे अल्पासंख्याक समुदायाने यावेळी नमूद केले आहे. तसेच निलेश सांबरे हे भिवंडी लोकसभा क्षेत्रातून निवडून यावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न आणि सहकार्य करणार असल्याचेही यावेळी उपस्थित जनसमुदायाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
जिजाऊ संघटनेतर्फे निलेश सांबरे सर्व जाती धर्माच्या सर्वसाधारण गोरगरीब जनतेसाठी जे अनमोल सानाजिक कार्य करत आहात त्याचा आम्ही आढावा घेतला. संपूर्ण देशामध्ये असे शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रात जाज्वल्य सामाजिक कार्य करणाऱ्या थोर व्यक्तींमध्ये आपले नाव सन्मानाने घ्यावेसे वाटते. त्यामुळे निलेश सांबरे हे भिवंडी लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले तर या परीक्षेत्राचा सर्वांगीण विकास नक्कीच होईल असा विश्वास यावेळी जिजाऊ संघटनेत प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शह कटशह , पक्ष -पक्षांतर या सगळ्या घडामोडी चालू असताना निलेश सांबरे यांच्या जिजाऊ संघटनेत मात्र जोरदार इनकमिंग चालू असल्याने जिजाऊ तेच जनतेतून सांबरे यांच्या विजय यात्रेलाही प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याने संघटनेचे प्राबल्य दिवसेंदिवस वाढतच आहे. यामुळे विरोधकांची आता झोप उडाली असल्याचे असून अपक्ष उमेदवार निलेश सांबरे हे निश्चितच प्रस्थापित राजकीय पक्षांच्या उमेदवारांसमोर तगडे आव्हान असणार आहेत .

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech