“माझी आई बाबांच्या दुसऱ्या लग्नाला गेली होती,” अभिनेत्री अलायाचा गौप्यस्फोट

0

मुंबई – अलाया फर्निचरवाला ही लोकप्रिय बॉलीवूड अभिनेत्री आहे. आपल्या चार वर्षांच्या करिअरमध्ये तिने अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं आहे. २०२० मध्ये ‘जवानी जानेमन’ मधून बॉलीवुड पदार्पण करणारी अलाया ही अभिनेत्री पूजा बेदीची मुलगी आहे. तिला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती, कारण घरात तिचे आजोबा कबीर बेदी दिग्गज अभिनेते राहिलेत, तर तिची आई पूजाही अभिनेत्री आहे.

अलायाचे वडील फरहान फर्निचरवाला यांनी पूजापासून घटस्फोट घेतल्यानंतर दुसरं लग्न केलं. त्यांनी नऊ वर्षांच्या संसारानंतर २००३ मध्ये पूजापासून घटस्फोट घेतला आणि २०१० साली लैला खानशी दुसरं लग्न केलं. त्यांच्या दुसऱ्या लग्नाला आई पूजा बेदी गेली होती, असा खुलासा अलायाने केला आहे. ‘बॉलीवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीत अलाया फर्निचरवालाने तिच्या आईच्या घटस्फोटाबद्दल खुलेपणाने भाष्य केलं आहे.

अलाया म्हणाली, “माझे आई-वडील घटस्फोटानंतर आपापल्या वेगळ्या मार्गाने जात होते, पण मी त्यांना नेहमी पाहायचो, त्यांची एकमेकांशी खूप चांगली मैत्री होती. आजपर्यंत ते खूप चांगले मित्र आहेत. माझी आई माझ्या वडिलांच्या दुसऱ्या लग्नाला गेली होती. इतकंच नाही तर मी माझ्या सावत्र आईच्या खूप जवळ आहे. माझी आई आणि सावत्र आई दोघीही माझ्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत.”

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech