अकोला – येथील श्री राजराजेश्वर मंदिराच्या विकासासाठी खोदकाम चालू असताना जमिनीखाली इमारत आढळून आली आहे.ही इमारत सुमारे २०० वर्षांपेक्षा जास्त वर्षांची असल्याचे सांगितले जात आहे. या मंदिराच्या आजुबाजूच्या परिसराचा विकास केला जात आहे.त्यासाठी खोदकाम सुरू आहे.हेच खोदकाम सुरू असताना जमिनीखाली भुयारीसारखी दिसणारी एक इमारत आढळून आली आहे. ही इमारत २०० वर्षापेक्षा जास्त वर्ष जुनी असल्याचे म्हटले जात आहे.या भुयाराच्या आतमध्ये असलेल्या पुरातन दगडांवर खूप वर्षांपूर्वी जय बजरंग बली, जय भोलेनाथ तसेच जय श्री राम लिहिलेलेसुद्धा आढळून आले आहे.
या भुयाराच्या आतमध्ये २ छोट्या दालने असून या भुयारात अंधार झाल्यानंतर कंदील लावण्यासाठी सोय करण्यात आली आहे. ही भुयारासारखी दिसणारी इमारत नेमकी कशासाठी तयार करण्यात आली असावी, याचा अंदाज घेतला जात आहे.