नवी दिल्ली : इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचे अध्यक्ष महामहिम डॉ. सय्यद इब्राहिम रईसी,आणि इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचे परराष्ट्र मंत्री महामहिम हुसेन अमीर-अब्दोल्लाहियायांचे एका हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. श्रद्धांजली म्हणून, भारत सरकारने 21 मे 2024 (मंगळवार) रोजी एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. या शोकदिनी, राष्ट्रीय ध्वज नियमितपणे फडकत असलेल्या सर्व इमारतींवर राष्ट्रध्वज अर्ध्यावर राहील आणि या दिवशी मनोरंजनात्मक कोणतेही शासकीय कार्यक्रम होणार नाहीत.