मुंबई – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या वर्षी जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत २४ टन सोने खरेदी केले आहे. त्यामुळे भारताकडील सोन्याचा साठा ८२७.६९ टनांवर गेला आहे. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत यंदाच्या पहिल्या चार महिन्यांत सुमारे दीडपट सोन्याची खरेदी झाली आहे. भू-राजकीय तणावादरम्यान अस्थिरता टाळण्यासाठी आरबीआय आपल्या साठ्यामध्ये विविधता आणत आहे. गेल्या वर्षी जानेवारी ते एप्रिल या कालावधीत रिझर्व्ह बँकेने १६ टन सोनेखेरदी केली होती. डिसेंबर अखेरीस भारताकडे ८०३.६ टन सोन्याचा साठा होता. जगभरात २०२४च्या पहिल्या तिमाहीत एकूण २९० टन सोन्याची खरेदी झालेली आहे. यात सर्वाधिक सोन्याची खरेदी चीनने केली आहे.