नागपूर – महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात अवकाळी पाऊस सुरूच आहे. मात्र, मुंबईतही अद्यापही पावसाचा मागमूस नाही. उकाड्याने त्रस्त झालेले मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. यंदा मोसमी पाऊस मुंबईत वेळेत दाखल होईल, असा अंदाज आहे. मुंबईत १० जूनपासून मान्सूनच्या पावसाला सुरुवात होईल. नैर्ऋत्य मोसमी वारे ३१ मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. केरळमध्ये मे महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये पावसाचा जोर वाढल्यानंतर महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.
केरळमध्ये जून महिन्याच्या पहिल्या आठवड्याच्या अखेरीस आणि दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीला पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. ३१ मेच्या आसपास केरळमध्ये मान्सूनदाखल होण्याची शक्यता आहे. मुंबईत मान्सूनच्या प्रवेशासंदर्भात अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. मात्र, मुंबईत मान्सूनच्या पावसाला वेळेत सुरुवात होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. मान्सून अंदमानात दाखल झाला असून १० ते ११ जून दरम्यान तो मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे.