डोंबिवली स्फोटातील मुख्य आरोपीस २९ मेपर्यंत पोलिस कोठडी

0

ठाणे – डोंबिवली फेज दोन भागातील एमआयडीसीमध्ये अमुदान कंपनीतील स्फोटातील मुख्य आरोपी मलय प्रदीप मेहतांना (३८) २९ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. मेहतांना ठाणे गुन्हे शाखेच्या पथकानं ठाण्यातून अटक करून आज कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले होते. यावेळी न्यायालयाने त्यांना २९ मे पर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे. तर त्यांच्या आई मालती मेहता(७०) नाशिकला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार नाशिक क्राईम ब्रांच युनिट एक तसंच ठाणे क्राईम ब्रांच पोलिसांनी संयुक्त कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले.

तर शुक्रवारीच बॉयलर स्फोटप्रकरणी मालती मेहता, त्यांचा मुलगा मलय मेहतांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. डोंबिवली एमआयडीसीतील केमिकल कंपनीला लागलेल्या आगीत आतापर्यंत मृतांचा आकडा १३ वर गेला असून ६५ नागरिक जखमी झाले आहेत. दुर्घटनास्थळी एनडीआरएफच्या टीमकडून ४५ तासांनंतरही शोध मोहिम सुरू आहे. ढिगा-याखाली काहीजण अद्यापही अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. या भीषण आगीने अनेकांचा बळी घेतला आहे. त्यामुळे स्फोट प्रकरणातील अरोपींवर कडक कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.

विशेष म्हणजे पोलिसांनी एक दिवसापूर्वीच संचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला होता. एफआयआरमध्ये मलय प्रदीप मेहता, मालती प्रदीप मेहता तसेच इतर संचालक, व्यवस्थापन कर्मचारी, कारखान्यावर देखरेख करणा-या अधिका-यांची नावे आहेत. या प्रकरणात मुख्य आरोपीवर ठाणे अपर पोलिस आयुक्त पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech