उन्हाच्या तीव्र उष्माघाताने बीएसएफचा जवान शहीद

0

जैसलमेर – राजस्थानमधील बिकानेर येथे उन्हाच्या तीव्र झळांमुळे घरातून बाहेर पडणे देखील कठीण झाले आहे. दुपारच्या वेळी तर उष्णतेचा कहर पाहायला मिळत आहे. अशातच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील जैसलमेर सीमेवर तैनात सीमा सुरक्षा दलाचा एक जवान शहीद झाला. अजय कुमार असे शहीद जवानाचे नाव आहे. उष्माघातामुळे जवानाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

सध्या देशभरात प्रचंड उकाडा पाहायला मिळत आहे. त्याचा परिणाम वाळवंटाच्या सीमेवरही झाला आहे, जिथे तापमान ५५ अंशांच्या वर गेले आहे. कडक उन्हात देशसेवा करत असलेल्या जवानांना नेटकरी सलाम करत आहेत. शहीद अजय कुमार हे रविवारी २६ मे रोजी सीमेवर तैनात होते. कडक उन्हामुळे अचानक त्यांची प्रकृती खालावली. यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. पण, सोमवारी २७ तारखेला सकाळी त्यांचा रूग्णालयात मृत्यू झाला. शहीद जवानाला रामगड रुग्णालय परिसरात गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. यादरम्यान १७३ व्या कोर सीमा सुरक्षा दलाच्या अधिका-यांनीही पुष्पचक्र अर्पण करून जवानाला श्रद्धांजली वाहिली.

दरम्यान, शहीद अजय कुमार यांचे पार्थिव रामगड येथून जोधपूरला नेण्यात येत आहे. त्यानंतर अजय यांच्या मूळ गावी पार्थिव नेले जाईल. ते पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथील रहिवासी होते. सध्या स्थानिक शेरगड पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. ज्याप्रमाणे दिल्लीपासून उत्तर प्रदेश-बिहारपर्यंत कडन उन जाणवत आहे, तसेच उन राजस्थानमध्येही आहे. हा वाळवंटी प्रदेश असल्याने येथील वाळू दिवसा इतकी गरम होते की लोक त्यावर पापड देखील भाजून निघतो. अलीकडेच एका जवानाने पापड भाजून दाखवल्याचा व्हीडीओ समोर आला होता.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech