इंडिगोच्या विमानात बॉम्बच्या अफवेमुळे प्रवाशांमध्ये घबराट

0

नवी दिल्ली – इंडिगो एअरलाईन्सच्या एका विमान आज पहाटे बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरल्याने प्रवाशांमध्ये पचंड घबराट माजली. हे विमान दिल्लीहून उतर प्रदेशच्या वाराणसीला जात होते. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान उड्डाणाच्या तयारीत असताना पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास विमानात बॉम्ब ठेवल्याची खबर मिळाली.

त्यामुळे विमानातील प्रवाशांना तत्काळ आपात्कालीन दरवाजातून खाली उतरविण्यात आले. काही प्रवाशांनी घाबरून विमानातून खाली उडी घेतली. मात्र सुदैवाने एकही प्रवासी जखमी झालेला नाही. त्यानंतर विमान निर्जन स्थळी नेण्यात आले.विमानतळावर तैनात सुरक्षा दलांनी विमानाचा ताबा घेतला. श्वान पथक, बॉम्बशोधत पथकाला पाचारण करण्यात आले. विमानाचा कोपरा न कोपरा तपासण्यात आला. तेव्हा विमानाच्या स्वच्छतागृहात एक टिश्यू पेपर सापडला. ज्यावर बॉम्ब असे लिहिले होते. प्रत्यक्षात ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले.त्यानंतर सीआयएसएफच्या पथकाने विमानात बॉम्ब नसल्याचे स्पष्ट केले आणि विमान पुन्हा टर्मिनलवर उड्डाणासाठी आणण्यात आले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech