मुंबई : मूळ कल्याणकर असलेल्या आणि सध्या अमेरिकेत स्थायिक असलेल्या पल्लवी माने-शिंदे यांचं ‘राहो मे मिलते है ऐसे’ हे गाणं लवकरच लॉन्च होत आहे. अल्ट्रा मीडिया हे गाणं लॉन्च करत आहे. लवकरच ते युट्यूबवर दिसणार आहे. विशेष म्हणजे पल्लवी माने-शिंदे यांचं हे गाणं हिंदीत आहे. पल्लवी यांचं हे पहिलंवहिलं गाणं आहे.
‘राहो मे मिलते है ऐसे’ या गाण्याच्या गीतकार पल्लवी शिंदे माने या मुळच्या कल्याणच्या आहेत. त्या गेली सात वर्ष अमेरिकेत स्थायिक आहेत. त्या अभिनेत्री आणि कवयित्री आहेत. त्यांचा काव्यसंग्रहही प्रकाशित झालेला आहे. त्यांना लेखनाचे अनेक राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यानंतर आता त्यांनी आता हिंदी गायन विश्वात पाऊल टाकलं आहे. या गाण्याचे संगीतकार आणि प्रोग्राम अरेंजर संजय महादेव आहेत. या गाण्याचे चित्रीकरण कोकणात झाले आहे. गाण्याचे दिग्दर्शन विजय शिंदे यांनी केले आहे. आतापर्यंत विजय शिंदे यांनी अनेक मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. या गाण्याला बॉलिवूडचे प्रसिद्ध बासरी वादक विजय तांबे (विजु दादा ) बासरीचा साज चढवला आहे. प्रसिद्ध गायक हरिहरन यांचे विद्यार्थी विशाल भांगे यांनी हे गाणे गायले असून आदिती नेरुरकर यांनी त्यांना गायनात उत्तम साथ दिली आहे. ‘राहो में मिलते है ‘प्रेक्षकांच्या पसंतीस येईल असा विश्वास गाण्याच्या संपूर्ण टीमने व्यक्त केला आहे.
अल्ट्रा मिडिया अॅन्ड एंटरटेंडमेंट , १९८२ मध्ये स्थापन झालेली एक भारतीय चित्रपट निर्मिती कंपनी आहे. तिची सुरुवात होम व्हिडिओ वितरणातून झाली आणि हळूहळू चित्रपट निर्मिती आणि नाटय वितरणात प्रवेश केला. अल्ट्राकडे पुरस्कारप्राप्त आणि ब्लॉकबस्टर फिचर फिल्म, टीव्ही ड्रामा, अनिमेशन , संगीत आणि डिजिटल सामग्रीच्या १५०० हून अधिक शीर्षकांची लायब्ररी आहे.