लोकसभा निवडणुकीच्या 57 जागांसाठी सातव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात

0

मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी आज म्हणजेच शनिवारी (1 जून) मतदान होत आहे. सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली. सातव्या टप्प्यात आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील लोकसभेच्या ५७ जागांवर मतदान होत आहे. तिसऱ्या टप्प्यात 10.06 कोटी मतदार 904 उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत.

निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात उत्तर प्रदेशच्या १३, पंजाबच्या १३, झारखंडच्या सहा, ओडिशाच्या सहा, हिमाचल प्रदेशच्या चार, पश्चिम बंगालच्या नऊ, बिहारच्या एका आणि चंदीगडच्या एका जागेवर मतदान होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात 904 उमेदवारांपैकी केवळ 95 उमेदवार महिला आहेत. पंजाबमध्ये सर्वाधिक उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. राज्यातील 328 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. गेल्या अडीच महिन्यांपासून सुरू असलेली निवडणूक प्रक्रिया सातव्या टप्प्यानंतर संपणार असून, 4 जून रोजी निकालाची प्रतीक्षा आहे. लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या सातव्या टप्प्यात 5.24 कोटी पुरुष आणि 4.82 कोटी महिला मतदार सहभागी होत आहेत. त्याच बरोबर 3574 तृतीय लिंग मतदार देखील मतदान करत आहेत.

सातव्या टप्प्यातील बड्या चेहऱ्यांबद्दल बोलायचे झाले तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून मीसा भारतीपर्यंत अनेक नावे निवडणूक रिंगणात उतरली आहेत. वाराणसी मतदारसंघातून पीएम मोदी, गोरखपूरमधून रवी किशन, पटना साहिबमधून रविशंकर प्रसाद, पाटलीपुत्रमधून मीसा भारती, मंडी मतदारसंघातून भाजपच्या कंगना रणौत आणि काँग्रेसचे विक्रमादित्य सिंग, डायमंड हार्बरमधून टीएमसीचे नेते अभिषेक बॅनर्जी, दुमका, भटिंडा येथून सीता सोरेन. हरसिमरत कौर बादल चंदीगडमधून तर मनीष तिवारी चंदीगडमधून निवडणूक लढवत आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech