देशात येणार १०० टन सोने

0

नवी दिल्ली – आपल्या देशात १०० टन सोने येणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी करत आहे. सध्या आरबीआयकडे ८२२.१ टन सोने आहे. त्यातील निम्मे सोने परदेशात आहे. याशिवाय विदेशात जमा केलेले सोनेही मायदेशी आणले जात आहे. सेंट्रल बँकेने ब्रिटनमध्ये खरेदी केलेले १०० टन सोनेही भारतात हस्तांतरित केले आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अलीकडेच सोन्याची मोठी खरेदी केली आहे. तसेच, सेंट्रल बँकेने ब्रिटनमध्ये खरेदी केलेले १०० टनांहून अधिक सोने देशातील त्यांच्या रिझर्व्हमध्ये हस्तांतरित केले आहे. सेंट्रल बँकेने ३३ वर्षांनंतर पहिल्यांदाच एवढे सोने आपल्या रिझर्व्हमध्ये ठेवले आहे. म्हणजे भारताने खरेदी केलेले सोने आता इंग्लंडच्या तिजोरीत राहणार नाही. त्यापेक्षा आता ते भारतीय रिझर्व्ह बँकेत ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, मार्चअखेर आरबीआयकडे ८२२.१ टन सोने होते. यापैकी रिझर्व्ह बँकेने ४१३.८ टन सोने विदेशात ठेवले आहे.

त्याच वेळी, गेल्या आर्थिक वर्षात, आरबीआयने त्यांच्या साठ्यामध्ये २७.५ टन सोन्याची भर घातली होती. अशा स्थितीत आरबीआय परदेशातून एवढे सोने का खरेदी करत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर आरबीआय हळूहळू परदेशात साठवलेल्या सोन्याचे प्रमाण कमी करुन ते भारतात आणत आहे. देशाची अर्थव्यवस्था मजबूत व्हावी यासाठी भारत आपले सोने परत आणत आहे. भारताला आपली अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी आणखी सोन्याची गरज आहे. देशातील सोन्याचा साठा वाढला पाहिजे असं भारताचे नियोजन आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech