तुळजाभवानी – तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील पुरातन दागिन्यांची पुरातत्व विभागाकडून इनकॅमेरा तपासणी सुरू झाली आहे. मंदिरातील पुरातन दागिने गहाळ झाल्याचे मंदिर समितीने नियुक्त केलेल्या समितीच्या अहवालातून स्पष्ट झाले. चक्क तुळजाभवानी देवीचा सोन्याचा एक किलो वजनाचा मुकूट गहाळ झाल्याचा अहवालही या समितीने दिला होता. हे गहाळ झालेले दागिने आणि जगदंबेच्या तिजोरीत शिल्लक असलेले दागिने खरेच पुरातन आहेत काय किंवा त्यांचीही अदलाबदली झाली, याची तपासणी पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथील पुरातत्त्व विभागातील सदस्य तज्ञ समितीकडून इनकॅमेरा सुरु झाली आहे.