इटानगर – अरुणाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. राज्यात 19 एप्रिल रोजी झालेल्या मतदानानंतर आज, रविवारी मतमोजणी करण्यात आली. यात भाजपने आतापर्यंत 34 जागांवर विजय मिळवला आहे.
अरुणाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या 60 जागा आहेत, त्यापैकी 50 जागांवर मतदान झाले असून 10 जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने 34 जागा जिंकल्या असून 11 जागांवर आघाडीवर आहे. देशातील सर्वात जुना पक्ष काँग्रेस अद्याप आपले खातेही उघडू शकलेला नाही आणि केवळ एका जागेवर आघाडीवर आहे. एनपीपीने दोन जागा जिंकल्या आहेत, पीपीएने दोन जागा जिंकल्या आहेत आणि एका अपक्ष उमेदवाराने एक जागा जिंकली आहे. दरम्यान अरुणाचल प्रदेशातील लोकसभेच्या दोन जागांसाठी 4 जून रोजीच मतमोजणी होणार आहे.