चीनमध्ये महिलांचे निर्बीजीकरणाचे प्रमाण वाढले

0

बीजिंग –  चिनी सरकार शिनजियांगमधील उघूरांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन करत आहे, त्यांचा छळ करीत आहे. लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी महिलांचे निर्बीजीकरण करीत आहे, त्यांच्यावर बलात्कार केला जात आहे.

त्यांचा वंशविच्छेद होत आहे. हा छळ किंवा नरसंहाराचाच प्रकार मानला पाहिजे, असे प्रसार माध्यमांनी म्हटले आहे. उघूरांना वेगळे विचार स्वीकारण्यास भाग पाडले जात आहे, त्यांचे विचारपरिवर्तन घडवून आणले जात आहे (ब्रेनवॉश). आमूलाग्र मतपरिवर्तन किंवा वृत्तीतील बदल करून व्यक्तीला नवीन व्यक्तिमत्त्व देण्याचाच हा आहे. हे सर्व आरोप चीनने सपशेल फेटाळले असले, तरी त्यावर कोणीही विश्वास ठेवण्यास तयार नाही. उघूर नावाच्या मानवसमूहाच्या बाबतीतील चीनचा व्यवहार हा निंदनीय, आक्षेपार्ह आणि मानवतेला काळीमा फासणारा आहे, असेच मुस्लीममेतर जग मानते आहे आणि मानत राहणार आहे, हे नक्की.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech