नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भाजपच्या नेतृत्वातील एनडीएची सरशी होताना दिसत आहे. एनडीएने ट्रेंडिंगमध्ये बहुमतासाठी लागणारा 272 चा टप्पा ओलांडला आहे.
त्याच वेळी, विरोधकांची इंडि आघाडी 188 जागांवर पुढे आहे. तर, इतरांनी आतापर्यंत 13 जागा पटकावल्या आहेत. ताज्या ट्रेंडमध्ये एनडीए पश्चिम बंगाल, बिहार, मध्य प्रदेश, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, राजस्थान, ओडिशा, झारखंड, छत्तीसगड, हरियाणा, दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, मणिपूर, सिक्कीम, नागालँडमध्ये आघाडीवर आहे. तर, तामिळनाडू, केरळ, पंजाब, जम्मू-काश्मीर, मेघालय, महाराष्ट्र, अंदमान आणि निकोबार बेटे, चंदीगड आणि पुद्दुचेरीमध्ये इंडी आघाडी आघाडीवर आहे.