निकालामुळे शेअर बाजारात घमासान; गुंतवणूकदार नाराज

0

मुंबई – लोकसभा निवडणुकीसाठी मतदान प्रकिया पार पडल्यानंतर मंगळवार ४ जून रोजी सकाळी ७ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली असून आघाडी आणि पिछाडीवर उमेदवारांची नावेही समोर येत आहेत. पण मतमोजणीच्या सुरुवातीचा ट्रेंड शेअर बाजाराला फारसा पसंत पडला नाही आणि सोमवारच्या व्यवहार दिवसाप्रमाणे निकालाच्या दिवशीही शेअर बाजार बंपर बाउन्सऐवजी प्रचंड घसरण नोंदवली गेली.

मतमोजणीच्या सुरुवातीच्या सत्रातील रंजक ट्रेंडमुळे सुरुवातीच्या सत्रात बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा सेन्सेक्स १,७०० हून अधिक अंकांनी घसरला तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टीनेही ४०० हून अधिक अंकांच्या घसरणीसह सुरुवात केली. तर यापूर्वी सोमवारी, एक्झिट पोलच्या अंदाजानंतर सोमवारी बाजारातील दोन्ही निर्देशांकांमध्ये विक्रमी तेजीचा कल दिसून आला.

प्री-ओपन मार्केटमध्ये बीएसई सेन्सेक्स ६४७.७५ अंकांनी वाढीसह ७७,११६.५३ अंकांवर उघडला तर NSE चा निफ्टी निर्देशांक १७२.५५ अंक वाढीसह २३,४३६.४५ वर उघडला पण काही वेळातच निर्देशांक घसरला आणि सेन्सेक्स १८३ अंकांनी घसरला, तर निफ्टी ८४ अंकांनी खाली आला. त्यानंतर सकाळी सव्वानऊ वाजता शेअर बाजाराच्या ओपनिंगला सेन्सेक्स आणि निफ्टी तोंडाशी आपटले. सेन्सेक्स १,७०८.५४ अंकांनी कोसळला तर निफ्टी ४०४ अंकांनी घसरून अवघ्या १५ मिनिटांच्या व्यवहारात २२,८५९ अंकांवर उघडला. निर्देशांमधील ही घसरण आणखी खोलवर गेली आणि सेन्सेक्स २,७०० अंकांनी घसरला.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech