लाच देण्यासाठी सुरू केले ईएमआय सुविधा

0

गांधीनगर – मागच्या काही वर्षांमध्ये विकासाच्या गुजरात मॉडेलची खूप चर्चा झाली आहे. गुजरातमधील विकासाची जाहिरात त्या माध्यमातून देशभरात करण्यात आली. मात्र सध्या गुजरातमधील एक मॉडेल पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. मात्र हे मॉडेल विकासाचे नसून लाचखोरीचे आहे. भ्रष्ट सरकारी अधिका-यांनी लाचेची देवाण घेवाण करण्यासाठी एटक व्यवस्था लागू केली आहे. या माध्यमातून विविध कामांसाठी लाच देणा-यांना ईएमआयची सुविधा देण्यात येत आहे.

काही भ्रष्ट अधिकारी हे लाच घेण्यासाठी एटकची सुविधा देत आहेत, असं सांगितल्यास तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. मात्र सध्या गुजरातमध्ये लाचखोरीचं हे एटक मॉडेल खूप प्रचलित होत आहे. दरम्यान, गुजरातमध्ये यावर्षी एटक च्या माध्यमातून लाच घेण्याची १० प्रकरणे समोर आली आहे. गुजरातमधील काही भ्रष्ट सरकारी अधिका-यांनी लाच घेण्यासाठीचा हा हटके फॉर्म्युला अमलात आणला आहे. तसेच लाच देताना कुणावर आर्थिक भार पडू नये म्हणून ही लाच सुलभ हप्त्याने देण्याची सोय करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या सुविधेचा लाभ घेऊन लोक लाचही देत आहे. एसीबीने लाचखोरीच्या या प्रकाराची १० प्रकरणे समोर आणली आहेत.

याबाबत गुजरातमधील एसीबीच्या अधिका-यांनी सांगितले की, आतापर्यंत अशी १० प्रकरणे समोर आली आहेत. मार्च महिन्यात जीएसटीच्या एका बनावटी बिल घोटाळ्यामध्ये एका व्यक्तीकडे २१ लाख रुपयांची लाच मागण्यात आली होती. त्यामध्ये २ लाख रुपयांच्या १० हप्त्यांमध्ये लाच देण्याची सवलत देण्यात आली होती. त्यामुळे लाच देणा-यालाही फार झाला नसता. तसेच घेणा-या अधिका-यांनाही पूर्ण पैसे मिळाले असते. दरम्यान, या लाचखोरांनी एका शेतक-याकडेही मोठ्या रकमेच्या लाचेची मागणी केली होती. मात्र त्याची परिस्थिती पाहून त्याला हप्त्यांमध्ये लाच देण्याची सवलत दिली होती.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech