मुंबई- लोकसभा निवडणुकीत राज्यात प्रकाश आंबेडकर यांचे नेतृत्व आण ‘वंचित फॅक्टर’ निष्प्रभ ठरला. वंचित बहुजन आघाडीने अधिकृत लढवलेल्या ३८ जागांवर पक्षाला फक्त १५ लाख ६६ हजार ९४९ मते मिळाली. अकोला आणि हिंगोली हे दोन मतदारंघ वगळता इतर ३६ मतदारसंघात वचिंतच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त करण्यात आले. अकोला लोकसभा मतदारसंघात वंचितचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांचाही दारूण पराभव झाला. प्रकाश आंबेडकर २ लाख ७६ हजार ७४८ मतांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिले.
अकोला आणि हिंगोली वगळता सर्वच ठिकाणी वंचितला एक लाखाच्या खाली मते मिळाली. प्रकाश आंबेडकरांकडे हक्काच्या दलित, ओबीसी आणि अलपसंख्याख समुदायाने पाठ फिरवल्याचे उघड झाले. मुंबई उत्तर-पश्चिम मध्ये ठाकरे गटाच्या अमोल किर्तीकर यांचा केवळ ४८ मतांनी पराभव झाला. जिथे वंचितच्या परमेश्वर रणशुर यांना १० हजार ५२ मते मिळाली. अकोल्यात भाजपाचे अनुप धोत्रे यांना ४० हजार ६२६ मतांनी विजय मिळाला. जिथे प्रकाश आंबेडकरांना २ लाख ७६ हजार ७४८ मते मिळाली. हातकणंगलेत ठाकरे गटाचे सत्यजीत आबा पाटील यांचा १३,४२६ मतांनी पराभव झाला. या मतदारसंघात वंचितच्या डी सी पाटील यांना ३२ हजार६९६ मते मिळाली.
बुलढाण्यात ठाकरे गटाच्या नरेंद्र खेडेकर यांचा २९ हजार ४७९ मतांनी पराभव झाला. या ठिकाणी वंचितच्या वसंतराव मगर यांना ९८ हजार ४४१ मते मिळाली. २०१९ मध्ये राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीला वंचितमुळे जवळपास १५ मतदारसंघात फटका बसला इतकीच वंचितची मुख्य कामगिरी ठरली .