नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीत 292 जागा मिळवून बहुमताचा आकडा पार करणार्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) आता सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू केल्या आहेत. बुधवारी नवी दिल्लीत झालेल्या एनडीएतील घटक पक्षांच्या बैठकीत एनडीएच्या नेतेपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एनडीएला सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी आज (7 जून) भेटीची वेळ दिली आहे. याआधी केंद्रीय सभागृहात एनडीएची बैठक पार पडत आहे. यावेळी सभेला संबोधित करताना जेडीयू अध्यक्ष नितीश कुमार यांनी मी पूर्णपणे तुमच्यासोबत असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.
नितीश कुमार म्हणाले की, मोदींनी गेल्या 10 वर्षात खूप काम केले आहे. जे काही काम शिल्लक आहे, ते येत्या काळात पूर्ण होईल. असे करून तुम्ही विरोधकांसाठी आरोप करण्याची संधी देणार नाहीत. त्यामुळे आमचा जेडीयू पक्ष भारताच्या पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देतो आहे. त्यांनी संपूर्ण देशाची सेवा केली आहे. त्यामुळे आम्ही पूर्णपणे त्यांच्यासोबत राहू. लोक अर्थाशिवाय बोलतात, पण पुढच्या वेळी तुम्ही (मोदी) याल तेव्हा आम्ही सगळे जिंकू, जे काही लोक इकडेतिकडे जिंकले आहेत ते हरतील, असे म्हणते नितीश कुमार यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
नितीश कुमार म्हणाले की, विरोधकांनी कमी काम केले आहे. खोटे बोलून तुम्हाला (मोदींना) काही जागा मिळाल्या आहेत, पण आता त्यांना आणखी एक संधी मिळाली, सर्व जागा जिंकण्याची. त्यामुळे माझी त्यांना विनंती आहेकी, तुमचे काम लवकर सुरू व्हावे. तुम्ही रविवारी शपथ घेणार आहात. शपथ आजच होते आहे, असे मानून मी अभिनंदन करतो. सर्वजण तुमच्या नेतृत्वाखाली काम करतील. मी एवढेच म्हणेन की, आम्ही त्यांच्यासोबत कायम राहू. नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढे जात राहू, असा विश्वास नितीश कुमार यांनी व्यक्त केला.