मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यावर एकनाथ शिंदेंची खास पोस्ट

0

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एनडीएचे प्रमुख म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली. लोकसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर एनडीएला सत्तास्थापनेसाठी बहुमत मिळाल्याचं स्पष्ट झालं. भारतीय जनता पक्षाला स्वबळावर सत्तास्थापनेसाठीचं गणित जुळवता आलं नसलं, तरी नितीश कुमार व चंद्राबाबू नायडू यांच्या सहकार्याने मोदींनी हे गणित जुळवून आणलं. या पार्श्वभूमीवर आज नरेंद्र मोदींचा तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी शपथविधी पार पडला असून त्यांच्यासह एनडीएमधील अनेक वरीष्ठ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.

दरम्यान, यावेळी शपथ घेण्याचा निश्चित क्रम ठरलेला होता. त्यानुसार, सर्वात आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शपथ घेतली. त्यांच्यानंतर राजनाथ सिंह यांनी शपथ घेतली. तिसऱ्या क्रमांकावर अमित शाह यांनी शपथ घेतली. चौथ्या क्रमांकावर नितीन गडकरी तर पाचव्या क्रमांकावर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी शपथ घेतली. नड्डांच्या नंतर शिवराज सिंह चौहान यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत.

बलसागर भारत होवो,
विश्वात शोभुनी राहो!

गेली दहा वर्षे व्रतस्थपणे देशाच्या कल्याणासाठी दिवसरात्र झटणारे, जागतिक पातळीवर भारताला मोठा सन्मान मिळवून देणारे आणि अहोरात्र गरिबांच्या कल्याणाचा ध्यास घेतलेले भारताचे भाग्यविधाते, विश्वगुरू नरेंद्र मोदी जी यांनी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. नवा भारत, श्रेष्ठ भारत घडवण्यासाठी त्यांच्या प्रयत्नात आम्ही भक्कम साथ देणार आहोत. भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या स्थानी नेण्याचे उराशी बाळगलेले स्वप्न आता पूर्ण होईल, ही खात्री आहे. गरिबांना, वंचितांना विकासाच्या प्रवाहात आणण्याची इच्छा पूर्ण होऊ शकेल. मोदीजींच्या नेतृत्वातील एनडीए सरकार देशाला नव्या उंचीवर नेऊन ठेवेल, असा विश्वास मला वाटतो. अशी पोस्ट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech