मोदींचा अपमान करणाऱ्या मालदीवचे पंतप्रधान शपथविधीला आल्याने नाराजी

0

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. सात देशांच्या राष्ट्रमुखांना शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले होते. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना, भुतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे, मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ, नेपाळचे पंतप्रधान पुष्पकुमार दहल प्रचंड, सेशल्सचे राष्ट्राध्यक्ष वेवेल रामखेलावन आणि मालदीवचे पंतप्रधान मोहम्मद मुईज्जू हे सात राष्ट्रप्रमुख मोदींच्या शपथग्रहण सोहळ्याला उपस्थित होते. या सात राष्ट्रप्रमुखांपैकी मालदीवचे पंतप्रधान मोहम्मद मुईज्जू यांच्या उपस्थितीमुळे देशभरात नाराजीचा सूर उमटला. याच मुईज्जू यांच्या मत्रिमंडळातील दोन सहकाऱ्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या लक्ष्यद्विप दौऱ्यावरून अत्यंत आक्षेपार्ह टिप्पणी करून त्यांचा अपमान केला होता, हे देशाची जनता विसरलेली नाही.

पंतप्रधान मोदी यांनी लक्ष्यद्विपच्या सौंदर्याची प्रशंसा करताना मालदीवपेक्षा लक्षद्वीप हे पर्यटन स्थळ म्हणून सरस आहे,अशा आशयाचे विधान करून देशवासियांना लक्षद्वीपला भेट देण्याचे आवाहन केले होते.मोदींच्या या दौऱ्यावर मुईज्जू यांच्या दोन सहकाऱ्यांनी मोदींचा अपमान करणारी टिप्पण केली होती. त्यावरून देशांत संतापाची लाट उसळली होती. भारतीय पर्यटकांनी मालदीवला भेट देणे जवळपास बंद केले होते. आपल्या देशाचा अपमान करणाऱ्या देशात सहलीला जायचे नाही,असे तमाम भारतीयांचे मत बनले होते.

त्याच मुईज्जू यांना पंतप्रधान मोदी यांनी तिसऱ्या शपथग्रहण सोहळ्यात सन्माननीय अतिथी म्हणून बोलावल्याने देशप्रमी भारतीयांमध्ये तीव्र नाराजी पसरली. मोदींनी यांनी मुईज्जू यांना सोहळयाला का बोलावले,असा प्रश्न अनेकांच्या मनात उत्पन्न झाला.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech