सेऊल – आता उत्तर कोरियादेखील सीमाभागात तसेच लाऊड स्पीकर लावणर असल्याचे दक्षिण कोरियाच्या लष्कराने म्हटले आहे.दक्षिण कोरियाने सीमाभागात लाऊडस्पीकर लावल्यानंतर आता उत्तर कोरियानेही तशीच कृती करून प्रत्युत्तर देण्याची तयारी केली आहे.
उत्तर कोरियातून घाणीने भरलेले तब्बल १ हजार बलून पाठवल्यानंतर दक्षिण कोरियाने सीमेवर लाऊड स्पीकर लावून उत्तर कोरियाविरोधी कार्यक्रमांचे प्रसारण करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्याला उत्तर कोरियाकडून त्याच प्रकारे प्रत्युत्तर दिले जाणार आहे. दोन्ही देश सध्या मानसशास्त्रीय युद्ध खेळत आहेत. दरम्यान, बलून पाठवण्याची आपली कृती ही दक्षिण कोरियाकडून सीमा भागात विमानातून पत्रके टाकली जाण्याला प्रत्युत्तर होते,असे उत्तर कोरियाने म्हटले आहे. उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांच्या एकाधिकारशाहीला आव्हान देणे हा उत्तर कोरियामध्ये अत्यंत संवेदनशील गुन्हा मानला जातो. त्यांच्या विरोधात प्रचार करणारी पत्रके विमानातून टाकणे सहन केले जाऊ शकणार नाही, असे उत्तर कोरियाने म्हटले आहे.सीमाभागात उत्तर कोरियाकडून किती आणि कोठे लाऊडस्पीकर लावले जात आहेत, याचा तपशील दक्षिण कोरियाकडून मिळू शकलेला नाही.