डोंबिवली – एका महिलेला तिने रिक्षात विसरलेली बॅग मानपाडा पोलिसांच्या मदतीने परत मिळाली आहे. हेमलता आडीवरेकर (52, रा. मालाड) प्रवासी महिलेचे नाव आहे. हेमलता या डोंबिवली पूर्वेकडील गांधीनगर येथे रिक्षाने आल्या असता प्रवासात त्यांची बॅग रिक्षात विसरून गेल्या होत्या. त्या बॅगेत आयफोन मोबाईल, 2 ॲपल वॉच, 2 ॲपल एअरबड्स होते. या संदर्भात हेमलता यांनी मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.
याअनुषंगाने वपोनि विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि महेश राळेभात, दिपक गडगे, यल्लाप्पा पाटील, देवा पवार, महेंद्र मंझा, गणेश बडे यांनी तक्रारीचा पाठपुरावा सुरू केला. हेमलता यांनी प्रवास केलेल्या रिक्षाचा सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून शोध घेतला. रिक्षात विसरलेली बॅग रिक्षावाल्याकडून हस्तगत करून हेमलता यांना सपोनि महेश राळेभात यांच्या हस्ते सुपूर्द केली
.