ईव्हीएम एक ब्लॅक बॉक्स : राहुल गांधी

0

नवी दिल्ली – काही दिवसांपूर्वी, म्हणजेच ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले. त्यानंतर आता इतक्या दिवसांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केला आहे. रविवार दि. १६ जून रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म (पूर्वीचे ट्विटर) वर एका पोस्टद्वारे त्यांनी निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित केला. त्यांच्या पोस्टमध्ये त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्याशी संबंधित एक बातमीही शेअर केली आहे. त्यांच्यावर एश्ट मध्ये छेडछाड करुन विजयी झाल्याचा आरोप आहे.

राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘‘एश्ट हा भारतातील ‘ब्लॅक बॉक्स’ आहे. त्यांची तपासणी करण्यास कोणालाही परवानगी नाही. देशातील निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत गंभीरचिंता व्यक्त केली जात आहे. जेव्हा संस्थांमध्ये उत्तरदायित्वाचा अभाव असतो, तेव्हा लोकशाही एक लबाडी बनते आणि फसवणूक होण्याची शक्यता वाढते अशी प्रतिक्रिया राहुल यांनी दिली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech