लंडन – विजय मल्या यांचा मुलगा सिद्धांत लवकरच त्याची मैत्रिण जस्मीन हिच्याबरोबर विवाहबद्ध होणार असून या विवाहानिमित्त आठवडाभर सोहळ्याचे आयोजन केले जाणार आहे. सिद्धांतनेच ही माहिती आपल्या इन्टाग्राम अकाऊंटवर दिली आहे. या बरोबरच त्याने जास्मीन बरोबरीचा एक फोटोही शेअर केला आहे.
गेल्या वर्षीच्या हॅलोविनच्या दिवशी त्याने तिला लग्नाची मागणी घातली होती. त्यानंतर या दोघांनी आपली अंगठी दाखवत फोटो काढले होते . हाच फोटो त्याने इन्टावर शेअर केला आहे. सिद्धांत हा मॉडेल व अभिनेता असून त्याने दोन पुस्तकेही लिहिलेली आहेत. त्याच्या मानसिक आरोग्यासंबंधीचे अनुभव त्याने त्याच्या या पुस्तकात लिहिले होते. लंडनच्या ड्रामा स्कुलचा विद्यार्थी असलेल्या सिद्धांतने काही कार्यक्रमांचे सूत्रसंचालनही केले होते.