अमेरिका- सौदी अरेबियातील जुना पेट्रोडॉलर करार संपुष्टात

0

वॉशिंग्टन – जागतिक अर्थव्यवस्थेतील एक महत्त्वाचा घटक असलेला अमेरिका-सौदी अरेबिया पेट्रोडॉलर करार ५० वर्षांनंतर संपुष्टात आला आहे.अमेरिकन डॉलरच्या बदल्यात कच्च्या तेलाच्या निर्यात करण्यासाठी या दोन्ही देशांनी या करारावर ८ जून १९७४ रोजी स्वाक्षरी केली होती.

या ५० वर्षांच्या कराराला पुन्हा मुदतवाढ न देण्याचा निर्णय सौदीने घेतल्याने बहा करार गेल्या रविवारी संपुष्टात आला.पेट्रोडॉलर करार अमेरिकेच्या जागतिक वर्चस्वाचा एक महत्त्वपूर्ण भाग होता. या करारानुसार आर्थिक सहकार्य आणि सौदी अरेबियाच्या सैन्यदलाच्या गरजांसाठी संयुक्त आयोगाची स्थापना करण्यात आली होती.पेट्रोडॉलर व्यवस्थेमुळे अमेरिकेने त्यांच्या चलनाचा संबंध सोन्याशी जोडणे बंद केले होते.पेट्रोडॉलर हे चलन नसून कच्च्या तेलाच्या निर्यातीसाठी अमेरिक डॉलरमधून होणार्‍या देवाणघेवाणीसाठी ही संज्ञा वापरली जाते. तेलनिर्यात करणाऱ्या देशांनी तेलाच्या विक्रीतून कमावलेल्या अमेरिकन डॉलरला ‘पेट्रोडॉलर’ म्हटले जाते.जागतिक अर्थशास्त्र आणि भौगोलिक राजकारण यासाठी ही व्यवस्था महत्त्वपूर्ण ठरली होती.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech