वाराणसी- तिसऱ्यांदा पुन्हा निवडून आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच त्यांचा लोकसभा मतदारसंघ वाराणसीला भेट दिली. त्यांच्या भेटीदरम्यान, त्यांनी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या १७ व्या हप्त्याचे वितरण शेतकऱ्यांच्या खात्यात केले आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वाराणसीच्या लोकांच्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
निवडणुकीत, पंतप्रधान मोदींनी काँग्रेस उमेदवार अजय राय यांचा १,५२,५२३ मतांच्या फरकाने पराभव करत महत्त्वपूर्ण विजय मिळवला. पीएम मोदींना ६,१२,९७० मते मिळाली, तर राय यांना ४,६०,४५७ मते मिळाली. बहुजन समाज पक्षाचे उमेदवार अथर जमाल लारी ३३,७६६ मतांसह तिसऱ्या स्थानावर आहेत.
“काशीच्या जनतेच्या प्रेमामुळे आणि आशीर्वादामुळे मला देशाचा पंतप्रधान होण्याची संधी मिळाली आहे. काशीच्या जनतेने मला तिसऱ्यांदा त्यांचा प्रतिनिधी म्हणून निवडले आहे. ‘माँ गंगा ने मुझे गोद ले लिया’ है, मैं यहीं का हो गया हूं’ (माता गंगा ने मला दत्तक घेतले आहे, मी आता वाराणसीचा भाग आहे) असे मोदी म्हणाले.
१८ व्या लोकसभा निवडणुकीत देशातील ६४ कोटींहून अधिक लोकांनी मतदान केले आहे , मी अलीकडेच G7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी इटलीला गेलो होतो. जर आपण G7 देशांचे सर्व मतदार जोडले तरीही भारतातील मतदारांची संख्या 1.5 पट जास्त असेल,” असे मोदी म्हणाले