भोपाळ – मध्य प्रदेशच्या जबलपूर येथे राहणार्या संकल्प सिंह परिहार यांनी उज्जैन येथील श्री महाकालेश्वर मंदिरात जगातील सर्वात महागडा आंबा अर्पण केला आहे. संकल्प सिंह परिहार हे बाबा महाकालचे भक्त असून त्यांनी सलग तिसर्या वर्षी आपला हा उपक्रम सुरू ठेवला आहे.जबलपूरचे रहिवासी सलग तिसर्या वर्षी आपला हा उपक्रम सुरू ठेवला आहे. त्यांनी आंब्याची लागवड केली . त्याला महाकाल हायब्रिड फार्म असे दिले आहे. त्यांच्या आमराईत १६ ते १७ जातींच्या आंब्याची १५०० झाडे आहेत. त्यांच्या या फार्म हाऊसमध्ये मियाझाकी हा जगातील सर्वात महाग आंबा पिकवला जातो. आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत २ लाख ७० हजार रुपये प्रतिकिलो आहे. हे आंबे उत्कृष्ट चवीचे आणि भरपूर पौष्टिक गुण असलेले असतात. संकल्प सिंह परिहार हे बाबा महाकाल यांचे भक्त असल्याने ते आंबा पिकाचे पहिले फळ बाबा महाकाल यांना अर्पण करतात.