कुल्लु – हिमाचल प्रदेशातील कुल्लुच्या भुंतर विमानतळावरुन उत्तराखंडच्या डेहरादूनसाठी विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. आठवड्यातून तीन दिवस ही विमानसेवा चालवण्यात येणार आहे. भुंतर विमानतळावरुन काल देहरादूनसाठी पहिल्या विमानाने उड्डाण केले. यावेळी परंपरेप्रमाणे पाण्याच्या फवाऱ्यांनी या विमानाचे स्वागत करण्यात आले. एटीआर १२ या विमानातून काल ४६ जणांनी प्रवास केला. भुंतरपासून ही विमानसेवा दर मंगळवार, गुरुवार व शनिवारी सकाळी साडेआठवाजता ही विमानसेवा चालवण्यात येणार असून यामुळे डेहरादून, ऋषिकेश हरिद्वार त्याचप्रमाणे उत्तराखंडच्या अनेक ठिकाणी जाणाऱ्या पर्यटकांना त्याचा फायदा होणार आहे. भुंतर विमानतळावरुन याआधी दिल्ली व अमृतसरसाठीही हवाईसेवा सुरु करण्यात आली आहे.