तुळजाभवानी मंदिराचा गाभारा देवीचे सिंहासन ‎सोन्याचे ‎होणार

0

धाराशिव – तुळजाभवानी मंदिर संस्थाने तुळजाभवानी मंदिराची पुनर्बांधणी आणि जीर्णोद्धाराचा निर्णय घेतला असून नवीन‎ गाभारा उभारण्यात येणार आहे. यात सोने व चांदीचा ‎‎उपयोग केला जाणार आहे. सिंहासनालाही ‎सोने व चांदीचा मुलामा देण्याचा प्रस्ताव ‎‎ आहे. पुरातत्व विभागाचे मार्गदर्शन‎ सल्ल्यानुसार हे बदल केले जातील.

पुरातत्व ‎‎विभागाच्या मदतीने तुळजाभवानी मंदिरातील ‎‎जुन्या बांधकामाची पुनर्बांधणी करण्यात येणार ‎‎आहे. यासाठी तडे गेलेले दगडी खांब काढून ‎‎नवीन खांब बसवण्यात येतील. मात्र, मंदिराचा ‎‎मूळ पोत बिघडणार नाही याची काळजी ‎घेतली जाईल. यासाठी ५५ कोटी रुपयांचा आराखडा ‎‎तयार करण्यात आला आहे, अशी माहिती ‎‎तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा ‎‎जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिली.‎

‎जिल्हाधिकारी डॉ. ओम्बासे यांनी सांगितले‎ की मंदिराची रचना खूप वर्षांपूर्वी करण्यात‎ आली होती. यामुळे मंदिराच्या बाहेर‎ पडण्यासाठी योग्य मार्ग नाही. आतमध्ये‎ येण्यासाठी सुद्धा मुख्य प्रवेशद्वारातूनच‎ पारंपारिक पद्धतीने प्रवेश देण्याची मागणी होत ‎आहे. या बाबीला अनुसरून मंदिरामध्ये बाहेर‎ पडण्यासाठी मार्गाची रचना करण्यात येणार‎ आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech