वॉशिंग्टन – अमेरिकत वर्षोनुवर्षे राहणा-या भारतीयांना ग्रीन कार्डसाठी आता जास्त काळ वाट पाहावी लागणार नाही. अमेरिकन सरकारने त्यांच्या इमिग्रेशन धोरणातंर्गत एक मोठा निर्णय घेतला आहे. ज्याचा फायदा अमेरिकेत राहणा-या भारतीयांना होणार आहे.
नोव्हेंबर महिन्यात होणा-या अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत हा मुद्दा प्रचाराचा एक भाग होता. त्यामुळे ज्यो बायडन प्रशासनाने विना दस्तावेज अमेरिकेत राहणा-या लोकांना त्यांच्याकडे घर आणि नागरिकता देण्याचा निर्णय घेतला आहे. पॅरोल इन प्लेस पॉलिसी ऑफ इमिग्रेशन अंतर्गत ही सुविधा दिली जाईल. त्यामुळेच त्याला पॅरोल इन प्लेस ग्रीन कार्ड असे दुसरे नाव देण्यात आले आहे. ही योजना लागू झाल्यास अमेरिकेत राहणा-या भारतीयांना मोठा दिलासा मिळणार आहे. माहितीनुसार, अमेरिकन सरकारच्या या धोरणामुळे अमेरिकेत विना दस्तावेज राहणा-या कमीत कमी ५ लाखाहून अधिक भारतीयांना त्याचा फायदा होणार आहे.
पती असो वा पत्नी ज्यांच्याकडे अमेरिकेत राहण्यासाठी ग्रीन कार्ड अथवा दस्तावेज नाही, ज्यांनी अमेरिकन नागरिकाशी लग्न केले आहे अशा लोकांचा यात समावेश आहे. १७ जूनपर्यंत जे लोक अमेरिकेत १० वर्षाहून अधिक काळ राहत आहेत त्यांनाच याचा फायदा होईल. पॅरोल इन प्लेस धोरणानुसार, १० वर्षाहून अधिक काळ विना दस्तावेज अमेरिकेत राहणा-या लोकांना देशात कायदेशीर कामासाठी मंजुरी मिळेल. पात्र असणा-या लोकांना निवासासाठी अर्ज करायला ३ वर्षाची मुदत असेल आणि ते ३ वर्ष वर्क परमिटसाठी पात्र ठरतील.