सुनीता विल्यम्स अडकल्या अवकाशात! जगाला लागली परतण्याची उत्सुकता

0

न्यूयॉर्क – भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स अन्य एका सहका-यासह तिस-यांदा अवकाशात रवाना झाल्या. यासह या दोघांनी बोईंग कंपनीच्या स्टारलाइनर अंतराळयानात आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारे पहिले सदस्य बनून इतिहास रचला. विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना घेऊन जाणारे बोईंगचे ‘क्रू फ्लाइट टेस्ट मिशन’ अनेक विलंबानंतर फ्लोरिडामधील केप कॅनाव्हेरल अंतराळ केंद्रावरून निघाले. अशा मोहिमेवर उड्डाण करणा-या पहिल्या महिला म्हणूनही विल्यम्स यांनी इतिहास घडवला.

आता त्यांना आयएसएसमधून परत येण्यात अडचण येत आहे. अंतराळयानामधील तांत्रिक अडचणींमुळे त्यांना पृथ्वीवर परत येण्यास विलंब होत आहे. लवकरच अंतराळ यानातील तांत्रिक अडचणी सोडवून ते पृथ्वीवर परत येतील असे अभियंत्यांनी सांगितले आहे. भारतीय वंशाच्या बुच विल्मोर आणि सुनीता विल्यम्स स्टारलाइनर स्पेसक्राफ्टने आयएसएसवर पोहोचले होते. स्टारलाइनर स्पेसक्राफ्टचे रिटर्न मॉड्यूल आयएसएसच्या हार्मनी मॉड्यूलवर डॉक केले आहे. हार्मोनी मॉड्यूलमध्ये फक्त मर्यादित इंधन शिल्लक आहे.

स्टारलाइनमध्ये पाच ठिकाणांहून हेलियम गळतीमुळे परतीचा प्रवास सुरू होऊ शकलेला नाही. सीएनएनच्या रिपोर्टनुसार, स्टारलाइनरकडे पाच थ्रस्टर्स आहेत त्यांनी काम करणे थांबवले होते. दरम्यान, सोशल मीडियावर वापरकर्ते म्हणत आहेत की स्टारलाइनरने केलेला अंतराळ प्रवास अत्यंत धोकादायक आहे. आता अंतराळवीरांना परत आणण्यासाठी स्पेसएक्स पाठवले जाणे आवश्यक आहे. अंतराळवीर जोनाथन मॅकडॉवेल म्हणाले की, काही थ्रस्टर्स अयशस्वी झाले तरीही दोन अंतराळवीर पृथ्वीवर सुरक्षितपणे परत येऊ शकतात. या छोट्या समस्यांमुळे लँंिडगमध्ये काही फरक पडणार नाही.

दोन अयशस्वी प्रयत्नांनंतर, बोईंग स्टारलाइनर ५ जून रोजी दोन्ही अंतराळवीरांसह रवाना झाले. २५ तासांच्या प्रवासादरम्यान अंतराळ यानात पाच ठिकाणांहून हेलियमची गळती होत असल्याचे आढळून आले. पाच थ्रस्टरने काम करणे थांबवले होते. बोईंग स्टारलाइनर प्रोग्रामच्या व्यवस्थापकाने स्वत: सांगितले की त्यांची हीलियम प्रणाली तयार केल्याप्रमाणे काम करत नाही. अभियंत्यांनाही ही समस्या काय आहे हे माहीत नाही.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech