वॉशिंग्टन – गेली अनेक वर्षे वाढत असलेल्या तापमानवाढीमुळे जीवघेणी गरमी वाढण्याचे प्रमाण तब्बल ३५ पट वाढल्याचे जागतिक तापमानवाढीबाबत अभ्यास करणा-या आंतरराष्ट्रीय स्तरावरील शास्त्रज्ञांच्या गटाने केलेल्या अभ्यासात पुढे आले आहे. सर्वांची चिंता वाढविणारा अहवाल समोर आला असून यंदाच्या उन्हाळ्यात भारतात तसेच जगाच्या इतर भागात मिळून हजारो लोकांचे बळी गेले आहेत.
अहवालात असेही म्हटले आहे की, चालू वर्ष आजवरचे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरले आहे. पृथ्वीच्या उत्तर गोलार्धातील बहुतेक प्रदेशांमध्ये पावसाळ्याचे आगमन होण्याच्या आधीच भीषण उष्णतेचा प्रकोप झालेला पहायला मिळतो. दरम्यान जगविख्यात भविष्यवेत्त्याने ४५० वर्षांपूर्वी त्याचे पुस्तक लेस प्रोफेटीजÞमध्ये जगातील अशा काही घटनांचे भाकीत केले आहे की त्या वेळोवेळी ख-या ठरत आल्या आहेत. २०२४ मध्येही काय काय घडेल याचा अर्थ त्याच्या अनुयायांनी लावला होता. हा भविष्यवेत्ता नॉस्ट्रेदामस होता. त्याने २०२४ मध्ये उष्णतेची लाट येईल, हवामान बदल होऊन दुष्काळ पडेल असे म्हटले होते.
आता संपूर्ण भारत उन्हाच्या लाटांत होरपळत आहे. तर सौदीमध्ये देखील उष्णतेत कमालीची वाढ झाली आहे. नॉस्ट्रेदामसने गेल्या १०० वर्षांसाठी जर्मनीत अॅडॉल्फ हिटलरच्या उदयापासून ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांच्यावर गोळीबार आणि २०२२ मध्ये जगण्याच्या संकटापर्यंत अशा अनेक गोष्टींवर भाकिते केली होती. यापैकी बरीच खरी ठरली आहेत. सात महिन्यांचे एक मोठे युद्ध होईल, ज्यामध्ये लोक त्यांच्या वाईट कृत्यांमुळे मरतील आणि रौएन आणि एव्हरेक्स राजाच्या अधीन राहणार नाहीत असे नॉस्ट्रेदामसने म्हटले आहे. याच काळात दोन युद्धे सुरु झाली आहेत.