तेहरान – राष्ट्राध्यक्ष रईसी यांच्या अपघाती मृत्यूनंतर आता इराणमध्ये राष्ट्राधक्षपदासाठी निवडणूक होत आहे.उदारमतवादी नेते मसौद पेझश्कीयन आणि प्रतिगामी विचारसरणीचे सईद जलील यांच्यामध्ये राष्ट्राध्यक्षपदासाठी अटीतटीचा सामना आहे.निवडणुकीची दुसरी फेरी आज सुरळीत पार पडली. पहिल्या फेरीत मतदारांच्या नाराजीमुळे अत्यंत कमी मतदान झाले होते. आजच्या दुसऱ्या फेरीत मतदारांचा जास्त उत्साह दिसून आला.राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढविण्यास मंजुरी देण्यात आलेले मसौद हे एकमेव उदारमतवादी नेते आहेत. त्यांनी पहिल्या फेरीत झालेल्या एकूण मतदानापैकी ४२ टक्के मते मिळविली, तर जलिली यांना ३९ टक्के मते मिळाली.इराणमधील नोंदणीकृत मतदारांची सहा कोटीच्या आसपास आहे. मात्र पहिल्या फेरीत अवघे चाळीस टक्के मतदान झाले.१९७९च्या इस्लामिक क्रांतीपासून आतापर्यंत झालेल्या निवडणुकांमध्ये झालेले हे सर्वात कमी मतदान ठरले.इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खोमेनी यांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करण्याचे आवाहन पहिल्या फेरीनंतर केले होते. त्याचा परिणाम आजच्या दुसऱ्या फेरीत जाणवला.