दिल्ली – भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएचे सरकार येत्या २३ जुलै रोजी सन २०२४-२०२५ साठीचा अर्थसंकल्प मांडणार आहे. २२ जुलैपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार असून अधिवेशन १२ ऑगस्टपर्यंत चालेल,अशी घोषणा संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांनी केली.तिसऱ्यांदा पंतप्रधान बनलेल्या नरेंद्र मोदी यांच्या या पहिल्या अर्थसंकल्पात काय काय असेल याबाबत अंदाज लावले जात आहेत.नोकरदार वर्गाला करामध्ये काही प्रमाणात सवलत मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र अंतरिम अर्थसंकल्पात नोकरदार वर्गाची काहीशी निराशा झाली होती. आता या अर्थसंकल्पात तरी करात सवलत मिळेल, अशी आशा नोकरदार वर्गाला आहे.