मुंबई – आपत्कालीन वैद्यकीय परिस्थितीत ‘डायल १०८’ ही रूग्णवाहिका सेवा अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या या सेवेने राज्यातील नागरिकांची आरोग्य सेवा करीत तब्बल १० वर्ष पूर्ण केली आहेत. या कालावधीत या रूग्णवाहिका सेवेने राज्यात १ कोटी ३ हजार ४४६ रूग्णांची विनामूल्य आरोग्य सेवा केली आहे. गरीब रुग्णांना या सेवेमुळे वेळेत उपचार मिळण्यासाठी मोलाची मदत झाली आहे.