मुंबई- राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या विधान परिषदेच्या ११ जागांसाठी आज झालेल्या निव़डणुकीत महायुतीचे सर्वच्या सर्व ९ उमेदवार निवडून आले. या निवडणुकीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर आणि रणनितीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले. या निवडणुकीत महायुतीचाच डंका वाजला असून महाविकास आघाडीमध्ये बिघाडीला सुरुवात झाली आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीकडून शिवसेनेच्या भावना गवळी (२४ मते) आणि कृपाल तुमाने (२५ मते) यांचा विजय झाला. शिवसेनेकडे ४६ मते होती. त्यात आणखी ३ मते शिवसेना उमेदवारांना मिळाली. शिवसेना आमदारांनी एकजूट दाखवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला. त्याचबरोबर इतर तीन अतिरिक्त आमदारांनी देखील मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाला समर्थन दिले.
महायुतीतील भाजपचे योगेश टिळेकर, पंकजा मुंडे, अमित गोरखे, परिणय फुके आणि सदाभाऊ खोत यांना प्रत्येकी २६ मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेश विटेकर यांना २३ मते आणि शिवाजीराव गर्जे यांना २४ मते मिळवून विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसकडे ४२ मते पक्की होती. त्यात त्यांना ५ अतिरिक्त मते मिळाली.
काँग्रेसकडे ३२ मते होती. त्यातील २५ मते प्रज्ञा सातव यांना मिळाली. काँग्रेसची पहिल्या पसंतीची ७ मते फुटल्याचा संशय असून यामुळे महाविकास आघाडीतील बिघाडी चव्हाट्यावर आली आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाने शेकापचे उमेदवार जयंत पाटील यांना उमेदवारी दिली होती. उबाठा गटाकडून मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. यात २३ मतांसह नार्वेकर यांचा विजय झाला तर जयंत पाटील यांचा पराभव झाला. विशेष म्हणजे उबाठाचे नार्वेकर हे दुसऱ्या पंसतीच्या मतांनी निवडून आली आहे. त्यांना विजयासाठी प्रतिक्षा करावी.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने फेक नरेटिव्हमधून मतदारांची दिशाभूल केली होती. मविआला आलेली तात्पुरती सूज विधान परिषदेच्या निकालानंतर उतरली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याचे सर्वसमावेशक नेतृत्वावर महायुतीबरोबरच अपक्ष आमदारांनी विश्वास दाखवला. विधान परिषद निवडणुकीसाठी मुख्यमंत्र्यांनी केलेली राजकीय रणनिती यशस्वी ठरली आणि महायुतीचे उमेदवार अतिरिक्त मतांसह विजयी झाले.
*महायुती अभेद्य! आमदार फोडण्याची वल्गना*
निवडणुकीपूर्वी उबाठा गटाकडून महायुतीचे आमदार फोडणार, असा फेक नरेटिव्ह पसरवण्यात आले. मात्र महायुती अभेद्य असल्याचे आजच्या निवडणुकीने दिसून आले. शिवसेनेचे आमदार फुटणार, या उबाठा गटाच्या वल्गना ठरल्या. काँग्रेस पक्षाची ७ मते फुटल्यानंतर महाविकास आघाडीतील बिघाडी समोर आली.