अमरावती – नांदगाव खंडेश्वर येथे शेकडो मुस्लीम बांधवांनी शिवसेना उध्दव बाळासाहेब गटात अभिजित पाटील ढेपे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनोज कडू यांच्या हस्ते भगवा दुपट्टा घालून प्रवेश केला. त्यामुळे तालुक्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. नांदगाव खंडेश्वर येथील जुना आठवडी बाजारात अभिजीत पाटील ढेपे यांच्या मार्गदर्शना शिवसेना ठाकरे गटातर्फे महिलांची मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिरात ३०० चे वर महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यात शुगर बी पी थॉयराईड सीबीसी इत्यादी आरोग्य तपासण्या व औषधोपचार सुद्धा मोफत देण्यात आले.
या शिबिराच्या निमित्याने मोठ्याप्रमाणात मुस्लीम बांधवांनी उपस्थित राहून काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला. तालुक्यात हा काँग्रेसला मोठा धक्का बसल्याची जोरदार चर्चा आहे. ऋषालीताई अभिजीतराव ढेपे यांनी फित कापून महिलाआरोग्य शिबिराचे उदघाटन केले.त्यानंतर मो.तोसिफ, मो.जहीर., अझर खान, मो. नझिम मो. नासीर, मो. रिजवान मो. नासीर यांच्या सह ८२ कार्यकर्त्यांनी तसेच सहारा कॉलनी येथील समीर शेख यांच्यासह ९६ कार्यकर्त्यांनी व १४२ मुस्लिम भगिनींनी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला. अभिजीत पाटील ढेपे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मुस्लीम यावेळी प्रमुख उपस्थिती शिवसेना जिल्हाप्रमुख मनोज कडू, प्रमुख पाहुणे म्हणून युवा सेनेचे प्रकाश मारोटकर, विधानसभा संघटक बाळासाहेब राणे, माजी पंचायत समितीकार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका प्रमुख प्रमोद कोहळे यांनी केले.