विधानसभेत ४० आमदार निवडून आणणारच..उपमुख्यमंत्री अजित पवार

0

(अनंत नलावडे)

मुंबई – ‘लोकसभेत आमच्या वाट्याला जरी पराभव आला असला तरी येत्या विधानसभा निवडणुकीत आम्ही आमचे सर्वच्या सर्व ४० आमदार निवडून आणणार म्हणजे आणणारच”, असा ठाम दावा उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी आमच्या वन महाराष्ट्रच्या प्रतिनिधीशी अनौपचारिक गप्पात बोलताना केला.

दादांनी घेतलेल्या या पवित्र्याने अचंबित झालेल्या पत्रकारांनी अधिक विचारणा केली असता ते म्हणाले की, आज घडीला महाविकास आघाडी काहीही दावा करत असले तरी त्यांचा दावा हा पोकळ बांबू असून लोकसभेला संविधान बदलणार असा फेक neretivha त्यांनी निर्माण केला. त्याचा फार मोठा फायदा तयांना झाला, असे जरी असले तरी विधानसभेच्या निवडणुकीलां सामोरे जात असताना विरोधकांकडे तसे फारसे काही मुद्दे आहेत असे मला वाटत नाही. आणि राहिला मुद्दा माझ्या निवडून येण्याचा तर काही चिंता करू नका,आपण२०२४ साली येथेच चहा पियत असू असा मार्मिक टोलाही त्यांनी कोणाचे नाव म घेता लगावला.

सध्या मराठा विरुद्ध ओबीसी असा आरक्षणावरून वाद राज्यात चिघळला आहे. त्यात त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते व राष्ट्रवादीचे नेते खा. शरद पवार यांच्या त्यांच्या निवासस्थानी घेतलेल्या भेटीबाबत विचारता अगदी खुलेपणाने कोणताही आडपडदा न ठेवता अजितदादा म्हणाले की, लोकशाहीत कोणीही कोणाला भेटू शकतो. प्रत्येकाला आपली स्वतंत्र मते असतात. त्यात सध्या राज्यात या दोन समाजात जी तणावाची परिस्थिती उद्भवली आहे ते पाहता राज्याच्या राजकारणातील एक ज्येष्ठ नेते म्हणून भुजबळ यांनी त्यांची भेट घेतली असावी त्यात काही गैर आहे असे आता तरी मला वाटत नाही. पण एक मात्र सांगतो त्यांनी त्यांची भूमिका अगदी खुलेपणाने स्पष्ट केलेली आहे.

आता राहीला प्रश्न विधानसभा निवडणुका कोणाबरोबर लढविणार याचा तर अगदीं ताडकन बोलत पवार म्हणाले,’ अर्थात महायुती म्हणूनच निवडणुका लढवणार. आणि आजच तुम्हालाही सांगतो की आम्हीच पुन्हा सत्तेत येणार. उगा कुणी*** नंदनवनात राहू नये,असे सांगत त्यांनी एकाच दगडात ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा नामोल्लेख टाळत सणसणीत टोलाही हाणला.

आज कधीही पत्रकारांना सहजी टाळणारेच अजित पवार यांनी विधानपरिषदेच्या निवडणूकीत त्यांच्या पक्षाचे तब्बल दोन आमदार अतिरीक्त मते घेवून निवडून आल्याबद्दल सर्वच मुंबईतल्या पत्रकारांसाठी क्रिकेट क्लब ऑफ इंडिया मध्ये खास पत्रकारांसाठी स्नेहाभोजनचा कार्यक्रम ठेवला होता. एरव्ही पत्रकारांशी हटकून बोलणारे दादा आज काहीतरी विशेष मूड मध्ये दिसत होते. अनेक जोक, किस्से ऐकवत त्यांनी उपस्थित पत्रकारांना जणू खिळवून ठेवले होते. त्यातही दादांना एकट्यात गाठत आगामी विधानसभा निवडणुकी मध्ये उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेविषयी भवितव्य विचारले असता ते अगदी शांतपणे म्हणाले की, कोकण हा माझा तसा तो जिव्हाळ्याचा विषय. आजपर्यंत सत्तेत असताना जेंव्हा कधी कोकणचा मग तो कोणत्याही का जिल्ह्याचा असेना मी ताबडतोब सकारात्मकच निर्णय घेतलेला आहे.आणि आता राहिला उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेचा तर तो त्यांचे पक्षाचे नेते व खा. संजय राऊत हे जेव्हढे सरकार विरोधात बोलतील तेव्हढे त्यांच्या विरोधात वातावरण जाईल. कारण मी कोकणी माणसाचा पूर्ण अभ्यास केला आहे. एकतर तो आत्महत्या करत नाही. आणि तशात पाहिले तर अगदी पालघर ते सिंधुदूर्ग पर्यंतच्या कोकण पट्ट्यात पहा यांच्या उद्योगा संबंधितांच्या भूमिकेबद्दल पहा तर सदा यांची नकारघंटा ठरलेलीच. हवे असल्यास माझ्या शेखर निकमला विचाचारा तो तुम्हाला खरी परिस्थिती सांगेल. त्यामूळे आता उद्धव ठाकरे यांनी कोकणचे दिवास्वप्न पाहू नये, यातच त्यांचा सन्मान आहे असे सांगत, चला आपण काहीतरी घासभर खावून घेवू असे सांगत त्यांनी गप्पांना पूर्णविराम दिला.
……….,……..(समाप्त)…………

Show quoted text

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech