मुंबई -डोंबिवली (घेसरगाव) येथून खाजगी बसने पंढरपूर येथे निघालेल्या वारकरी भक्तांचा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या पहाटे भीषण अपघातातील मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना शासनातर्फे ५ लाख रुपये मदत देण्याचे आणि जखमींवर शासनातर्फे मोफत उपचार करण्याचे सक्त निर्देश मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
कळंबोली नवी मुंबई येथील महात्मा गांधी मिशन रुग्णालयात मुख्यमंत्री शिंदे यांनी आज भेट देऊन जखमींची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. शासन आपल्या पाठीशी असल्याचे सांगत रुग्णांना दिलासा दिला.यावेळी त्यांनी जखमींवर केल्या जाणाऱ्या उपचारांची सविस्तर माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांशी जाणून घेतली.जे त्यात अतिदक्षता विभागात उपचार सुरु असणाऱ्या रुग्णांना अधिक उपचारासाठी अन्य रुग्णालयात स्थलांतरीत करावे लागल्यास तसेही करावे अशीही सूचना त्यांनी यावेळी केली.
खाजगी बस आणि ट्रॅक्टर यांच्या मध्ये झालेल्या अपघातात ४६ जखमी आहेत.त्यापैकी ७ वारकरी गंभीर जखमी असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असून
झालेल्या अपघाताची संपूर्ण चौकशी करण्याचे आदेशही मुख्यमंत्री शिंदे यांनी संबंधित यंत्रणांना यावेळी दिले.
……………………….