“माऊली, तुमचं वडील न तुम्हीच खरं आमचं वारकरी..! काय बदोल केलाय!”

0
  1. ( प्राजक्त झावरे – पाटील )

———– 

वाखरी – पंढरपूर 

— सध्या दुर्मिळ होत चाललेल्या धोतराला सावरत एक ६०-६५ चा वारकरी बोलत होता. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीच दर्शन घेऊन डॉ श्रीकांत साहेब पालखीचे सारथी म्हणून बसलेले असताना “हा” त्या पालखीच्या दर्शनाला आलेला एक भक्त..! “ असा मुख्यमंत्री मी पहिलाच नाय..” ते मोकळेपणाने बोलत होते. ओठांबाहेर आलेल्या पांढऱ्या पण टोकदार मिश्या सावरत; अंगातल्या नेहरूच्या खिशातून एक हात बाहेर काढून आपली कडक टोपी सावरत ते बोलत होता..!

“ वारीच्या आधी आले, गाडीवरून फिरले.. पार जमिनीवरला माणूस बघा हा.. येगळाच..” ते बोलतं होते .. बोलत होते.. बोलत होते.. तंबाखू रंगाचे त्याचे दात, टोपीच्या बाहेर डोकावणारे विस्कटलेले पांढरट केस, चेहऱ्यावर कष्टाच्या घामाने झालेले सुरकुतेदार नक्षीकाम पण… एका वेगळ्या आनंदाने त्याचें डोळे बोलत होते. समाधानाचे बोल..! मुख्यमंत्री काहीतरी वेगळे करतात याचाच हे बोलके उदाहरण..!

फक्त वारी, संत – परंपरे संदर्भात मुख्यमंत्री यांनी घेतलेले निर्णय जरी पहिले तरी त्या आजोबांचे आशेने टपोरे झालेल्या डोळ्यांची चमक लक्षात येईल. मुख्यमंत्री यांनी मुख्यमंत्री वारकरी महामंडळाची स्थापना केली, पंढरपूर मंदिर विकास आराखडा आखला, पंढरपूरच्या वारीचा जागतिक वारसा नामांकनासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठविला, पंढरपूरच्या वारीला जाणाऱ्या मुख्य पालख्यातील दिंडींना न भूतो असे प्रति दिंडी 20 हजार रूपये दिले, वारीला जास्तीत जास्त स्वच्छ ठेवण्यासाठी ‘ निर्मल वारी’ करिता 36 कोटी 71 लाख रुपयांचा निधी दिला , पंढरपुरच्या यात्रा अनुदानात पाच कोटींवरून दहा कोटींची तरतूद केली, नगर-नेवासा येथील ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरी लिहिलेले मंदिराचा विकास आराखडा तयार केला , आळंदी- देहू ते पंढरपूर आणि प्रमुख पालखी मार्गांचा विकास सुरू आहे, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून देहू-आळंदी ते पंढरपूर या दोन्ही मुख्य पालखी मार्गावरील सर्व वारकऱ्यांची आरोग्य तपासणी सुरू आहे, मोफत औषधोपचार -वाकरऱ्यांसाठी अपघात विमा योजना कार्यान्वित केली.. वारकरी पेन्शन योजना, पंढरी वारी मार्गावरील गावांना, नगरपरिषदांना विशेष निधी दिला… काय नि किती निर्णय ? यापूर्वी झाले होते असे कधी?? बघा आणि सांगा..! नाही ना… कधीच नाही झाले असे.. आता हेच पाहा ना सध्या लाडली बहीण या योजनेने प्रसिद्धीचा उच्चांक गाठला आहे, ST प्रवास मोफत किंवा निम्या दरात उपलब्ध होत आहे, पीक विमा १ रुपयात मिळत आहे.. असे मुख्यमंत्र्यांचे एकामागून एक निर्णय मनाच्या पालखीला परिक्रमा घालत फेर धरत पुढे येत होते..!

या विचारांच्या तंद्रीला “जय हरि माऊली म्हणत” आजोबांनीच भंगले..! आपले धोरत सावरत तरतर ते पुढे निघून गेले.. त्यांच्या पाठमोऱ्या आकॄतीच्या पुढे “ मदतीचा हात एकनाथ” हा फलक दिमाखात उजळताना मी पाहत होतो..!

———————————————————

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech