रत्नागिरी – पाली (ता. रत्नागिरी) येथील नूतनीकरण केलेल्या एसटी बसस्थानकाचे उद्घाटन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. मुख्य़मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याचे निमंत्रण पत्रिकेत नमूद करण्यात आले आहे. मात्र ते उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्र्यांचा कोणताही दौरा जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाला मिळालेला नाही.
समारंभाला खासदार सुनील तटकरे, खासदार नारायण राणे, आमदार प्रसाद लाड, आमदार निरंजन डावखरे, आमदार भास्कर जाधव, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार शेखर निकम, आमदार राजन साळवी, आमदार योगेश कदम, सिंधुरत्न योजनेचे विशेष निमंत्रित किरण सामंत, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार आदी उपस्थित राहणार आहेत.