आता पूजा खेडकर यांच्या अपंगत्व प्रमाणपत्राविषयी यांच्यावर अटकेची टांगती तलवार

0

मुंबई – वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. त्यांच्या अवाजवी आणि अवास्तव मागण्यानंतर या प्रकरणात एका मागून एक धक्कादायक खुलासे समोर आले. त्यात त्यांच्या आईला सुद्धा अटक झाली आहे. आता त्यांच्या अपंगत्व प्रमाणपत्राबाबत उलटसूलट चर्चा सुरु असतानाच मोठी बातमी समोर येत आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाने मोठे पाऊल टाकले आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांचे धाबे दणणाले आहे.

सर्वांची होणार झाडाझडती वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरांवर अटकेची टांगती तलवार असतानाच त्यांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र देणाऱ्यांचे ही आता धाबे दणाणले आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाने वायसीएम रुग्णालयाच्या डॉक्टरांसह पूजाला मदत करणाऱ्या प्रत्येकाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणातील सर्व संबंधितांची चौकशी करण्यात येणार आहे. त्यात काही तथ्य आढळल्यास कारवाई होणार आहे.

रॅकेट तर नाही ना? : तसेच खोटे अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवून देणारे रॅकेट असल्यास, ते ही उघडकीस आणावे लागणार आहे. दिव्यांग कल्याण आयुक्तालयाने जिल्हाधिकारी कार्यालयाला तशा सूचना दिल्या आहेत. त्याआधारे पिंपरी पालिकेच्या वैद्यकीय विभागाला दिलेला याविषयीचा आदेश समोर आला आहे.

7 टक्के अधु असल्याचे प्रमाणपत्र : वायसीएम रुग्णालयाने पूजा खेडकरांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र दिले असून, त्यात पूजा डाव्या गुडघ्यात कायमस्वरूपी सात टक्के अधु असल्याचं म्हटलंय. याच प्रमाणपत्राच्या आधारे पूजाने केंद्रीय दिव्यांग विभागाकडून अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळविल्यानं, या चौकशीला अधिक महत्व प्राप्त झालं आहे.

तर मग होणार गुन्हा दाखल : कारण दिव्यांग कल्याण आयुक्तालयाने वायसीएमच्या खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे त्या शासकीय सेवेत रुजू झाल्यात का? अशी शंका उपस्थित केली आहे. त्याअनुषंगाने याची खात्री पटवण्यासाठी सखोल चौकशी गरजेची आहे. चौकशीत दोषी आढळल्यास अपंगत्वाचे प्रमाणपत्र देणारे डॉक्टर, तसेच मदत करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा. तसेच खोटे अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवून देणारे रॅकेट आहे का? हे उघडकीस आणावे. तसेच या संपूर्ण चौकशीचा अहवाल ही जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करावा. असं या आदेशात म्हटलेलं आहे. त्यामुळं अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवून देणाऱ्या डॉक्टरांसह मदत करणाऱ्या प्रत्येकाचे धाबे दणाणले आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech