लष्कराची एक तुकडी सांगली शहरात दाखल – जिल्हाधिकारी

0

सांगली – जिल्ह्यातील पूर परिस्थिती सध्या आटोक्यात आहे. यदा कदाचित पुढील काही दिवसात पूरस्थितीचे संकट उद्भभवल्यास याचा यशस्वी मुकाबला करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला मदत म्हणून इंडियन आर्मीची एक तुकडी जिल्ह्यात दाखल झाली आहे. यामध्ये सुमारे 90 जवान आणि 10 अधिकाऱ्यांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी बैठकीत दिली.

जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, सध्या पावसाचे प्रमाण तसेच कोयना धरणातून विसर्गाचे प्रमाण कमी करण्यात आले असले तरी गाफील राहून चालणार नाही. शनिवार व रविवार या दिवशी अधिक पर्जन्यमान झाल्यास आपत्कालीन स्थिती निर्माण होऊ शकेल. आपत्कालीन स्थिती उद्भभवल्यास जिल्हा प्रशासन त्याचा मुकाबला करण्यास समर्थ आहे. यावेळी पोलीस अधीक्षक घुगे, मनपा आयुक्त गुप्ता, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी धोडमिसे यांनी प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या तयारीची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.

तर आम्ही कोणत्याही परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी सदैव तयार आहोत. नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. नागरिकांच्या मदतीकरता आम्ही तत्पर आहोत. आर्मीच्या (सैन्यदल) वतीने आम्ही सर्वस्वी योगदान देऊ, अशी ग्वाही मेजर संकेत पांडे यांनी दिली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech